इनक्लीन ट्रस्टचे संचालक डॉ. एन. के. अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील देशातील कोविड वर्किंग ग्रुपने कोव्हीशिल्ड व्हॅक्सिनच्या दोन डोसांमधील कालावधीत 12 ते 16 आठवड्याने वाढ करण्याची शिफारस केली आहे. सध्या हा कालावधी 6 ते 8 आठवडे इतका आहे.
प्रत्यक्ष जीवनातील पुराव्यांच्या आधारे खास करून ब्रिटनमधील कोवीड वर्किंग ग्रुपने कोव्हीशिल्ड व्हॅक्सिनच्या पहिल्या व दुसऱ्या डोसामधील कालावधी 12 ते 16 आठवडे इतका करण्यास मान्यता दिली आहे. कोव्हॅक्सिनच्या बाबतीत अद्याप कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही.
दरम्यान, काल बुधवारी 12 मे रोजी झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत डॉ. व्ही. के. पाॅल यांच्या नेतृत्वाखालील देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम अंमलात आणणाऱ्या राष्ट्रीय तज्ञ मंडळाने कोवीड वर्किंग ग्रुपची शिफारस मान्य केली आहे.
त्याचप्रमाणे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने देखील कोव्हीशिल्ड व्हॅक्सिनच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसामधील कालावधी 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढविण्याच्या शिफारशीला मान्यता दिली आहे.
The COVID Working Group comprises of the following members:
Dr N K Arora- Director, INCLEN Trust
Dr Rakesh Agarwal, Director and dean, GIPMER, Puducherry
Dr Gagandeep Kang, professor, Christian Medical College, Vellore
Dr J P Mulliyal, Retd professor, Christian Medical College, Vellore
Dr Naveen Khanna, Group Leader, International Centre For Genetic Engineering And Biotechnology (ICGEB), JNU, New Delhi