बेळगाव जिल्हा आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 10 मेपासून आजतागायत आठवड्याभराच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वाधिक 2719 कोरोनाग्रस्त रुग्ण बेळगाव तालुक्यात आढळून आले असून खानापूर तालुक्यात सर्वात कमी म्हणजे 319 रुग्ण सापडले आहेत. त्याप्रमाणे काल रविवारी कोरोना तपासणीचा पॉझिटिव्ह रेट 80 टक्के इतका होता.
जिल्ह्यात गेल्या 10 मे पासून आज सोमवार दि. 17 मे 2021 या कालावधीमध्ये बेळगाव तालुक्या खालोखाल गोकाक तालुक्यामध्ये 1010 इतके जास्त रुग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये आढळून आलेल्या कोरोना बाधितांची एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. अथणी -852, बेळगाव -2719, बैलहोंगल -524, चिक्कोडी -521, गोकाक -1010, हुक्केरी -573, खानापूर -310, रामदुर्ग -396, सौंदत्ती -539 आणि इतर -156.
दरम्यान, बेळगाव जिल्ह्यात गेल्या 11 मे 16 मे 2021 पर्यंत दररोज आढळून आलेले कोरोना बाधित रुग्ण, मृतांची संख्या, त्या दिवशी झालेल्या कोरोना तपासण्यांची संख्या आणि पॉझिटिव्ह रेट यांची आकडेवारी खालील प्रमाणे आहे.