कोरोनासंदर्भातील फेसमास्क आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेळगाव जिल्ह्यात 11 मे ते आत्तापर्यंत 36,352 गुन्हे दाखल झाले असून 45,29,250 रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे.
फेसमास्क आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या सात दिवसात जिल्ह्यात 6,043 गुन्हे दाखल झाले असून 7,56,700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत 240 गुन्हे, कर्नाटक संसर्गजन्य रोग कायदा 2020 अंतर्गत 117 गुन्हे आणि ऑक्सिजन आणि रेमडीसिवीर संदर्भात 1 गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, गेल्या 11 मेपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. सध्या कोवीशिल्ड लसीच्या 15,116 कुपींचा साठा उपलब्ध आहे.
लसीकरण मोहिमेअंतर्गत उपलब्ध साठ्यातून सध्या जिल्ह्यातील 22,95,517 नागरिकांपैकी 14,986 जणांना कोवीशिल्डचा डोस देण्यात आला आहे.