कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात संपूर्ण लॉक डाऊन लावावा की नाही याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत असे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी स्पष्ट केले आहे.
बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होणार आहे त्यात मोदी जे बोलतील त्यावर आम्ही अंमलबजावणी करणार आहोत त्यांच्या निर्णयाची वाट पाहणार आहोत असे ते म्हणाले.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला काय संबोधित करणार यावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे केंद्राने जर संपूर्ण देश लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतल्यास तो संपूर्ण देशाला अमलात आणावा लागणार आहे.
बुधवार सकाळी पासून मोदी पूर्ण देश 15 दिवस लॉक डाऊनची घोषणा करण्याची शक्यता आहे टास्क फोर्स ने लॉक डाऊन करा असा सल्ला दिला आहे अश्या बातम्या येऊ लागल्या होत्या.