पुढे ढकलण्यात आलेली पदवीपूर्व द्वितीय वर्षाची वार्षिक परीक्षा आणि राज्यातील कोरोनाग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन सीईटी -2021 परिक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वत नारायण यांनी जाहीर केले आहे.
सामान्य प्रवेश परीक्षा 2021 अर्थात सीईटी 2021 परीक्षा येत्या 7 आणि 8 जुलै 2021 रोजी तसेच कन्नड भाषा परीक्षा 9 जुलै 2021 रोजी होणार होती. मात्र ती आता पुढे ढकलण्यात आली आहे.
आता सुधारित वेळापत्रकानुसार सीईटी -2021 परीक्षा येत्या 28 आणि 29 ऑगस्ट 2021 रोजी तसेच कन्नड भाषा परीक्षा 30 ऑगस्ट 2021 रोजी घेतली जाणार असल्याचे अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, पुढील अर्ज ऑनलाईनच अपलोड केले जातील, त्यामुळे उमेदवारांनी http://Kea.kar.nic.in या केईए वेबसाईटच्या संपर्कात राहावे, असे आवाहन उच्च शिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वत नारायण यांनी केले आहे.