Sunday, November 24, 2024

/

श्रीराम सेनेच्या 8 रुग्णवाहिका सज्ज-रक्तदान शिबिर उस्फूर्त प्रतिसाद

 belgaum

कोरोना प्रादुर्भाव थोपविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने श्रीराम सेना हिंदुस्तानने 8 रुग्णवाहिका उपलब्ध केल्या आहेत, अशी माहिती श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी दिली.

श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे आज आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराप्रसंगी कोंडुसकर बोलत होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि पर्यायाने प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तेंव्हा प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने आम्ही रुग्णसेवेसाठी 8 रुग्णवाहिका उपलब्ध केले आहेत. त्याप्रमाणे ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा करण्यासाठी एक वाहन तैनात करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर तीन-चार महिने रक्तदान करता येत नसल्यामुळे आज रक्तदान शिबिराचेही आयोजन केले आहे, असे रमाकांत कोंडुसकर यांनी सांगितले.

सध्या शहरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. याकडे कृपया प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन मुबलक प्रमाणात ऑक्सीजन उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. त्याचप्रमाणे कोरोनामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीचा गैरफायदा घेऊन वैद्यकीय सुविधा पुरविताना लोकांची लुबाडणूक केली जात आहे. या प्रकारांना देखील त्वरित पायबंद घातला जावा. तसेच रुग्णवाहिका किंवा अन्य कोणतीही गैरसोय असल्यास नागरिकांनी श्रीराम सेना हिंदुस्तानच्या पदाधिकारी अथवा कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही रमाकांत कोंडुसकर यांनी केले.Blood donation camp

श्रीराम सेनेचे रक्तदान शिबिर उस्फूर्त प्रतिसाद

वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली सध्याची प्रतिकूल परिस्थिती आणि कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर रक्तदान करता येणार नाही हे विचारात घेऊन श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे आयोजित रक्तदान शिबिर आज रविवारी उत्साहात पार पडले.

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही महिने रक्तदान करता येणार नाही हे विचारात घेऊन श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे आज रविवारी मराठा सांस्कृतिक भवन येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. सदर शिबिरामध्ये 160 जणांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवून रक्तदान केले. या रक्तदात्यांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता हे विशेष होय. सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांसह श्रीराम सेना हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.