कोविड लसीकरण करण्यासाठी तीन तीन तास रांगेत थांबल्याने वृद्धाना त्रास सहन करावा लागत आहे.कोरोना लसीकरण करुन घेण्यासाठी, तीन तीन तास रांगेत थांबून जेष्ठ नागरिक कंटाळून गेले आहेत.बीम्स मध्ये फक्त कोविशील्ड उपलब्ध आहे,त्यामुळे को वॅक्सीनचा दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या जेष्ठ नागरिकांना विनाकारण तासंतास लोम्बकाळत उभे राहावे लागत आहे.
कोरोनाच्या काळात बेळगावमधील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी , सरकारकडून देण्यात येत असलेली कोविशील्ड आणि कोवॅक्सीन लस घेण्यासाठी बीम्स हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी होत आहे.
पहिली लस घ्यायला आले तर कोणी दुसरी लस घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत मात्र इथे वॅक्सीनची कमतरता आहे . पहिल्या टप्प्यात कोविशील्ड घेतलेल्या लोकांनाच आत सोडले जात होते त्यामुळे रांगेत थांबून लोक कंटाळून आले होते.
३ तासांपासून रांगेत थांबून आहोत . पण इथे कोणीही माहिती देण्यास तयार नाहीत . किमान इथे आलेल्यांचे नाव ,नंबर , आधारकार्ड घेऊन , त्यांना कधी यायचे याबद्दल तरी माहिती दिली असती तर त्यांनाही बरे झाले असते आणि आम्हालाही बरे झाले असते असे मत रांगेत थांबलेले वृद्ध संतप्त होऊन बोलत होते.
सकाळपासून आम्ही इथे को वक्सीन साठी आलो आहोत , पण त्याचा स्टॉक नाही असे सांगत आहे . फक्त कोविशील्ड लस असून त्यांना आत घेत आहेत अशी भावना देखील अनेकांनी बोलून दाखवली.
एकंदरीत , बीम्स रुग्णालयात लस घेण्यासाठी आलेल्या जेष्ठ नागरिकांना योग्य माहिती देण्यास तिथे कोणीही स्टाफ उपलब्ध नसल्याने , तसेच कोवॅक्सीन लस उपलब्ध नसल्याची माहिती देखील देण्यात न आल्याने जेष्ठ नागरिकांना उगाचच तासंतास रांगेत , थांबावे लागले . बीम्स प्रशासनाने याची दखल घेऊन किमान , उपलब्ध लसींची माहिती देणे गरजेचे आहे .