बेळगाव जिल्ह्यात रविवारी 1171 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत तर 1134 जण डिस्चार्ज झाले आहेत सक्रिय रुग्ण संख्या 16455 झाली आहे.
रविवारी कोरोना मुळे 5 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मयत संख्या 536 झाली आहे.
गेल्या दहा दिवसांत 22.89% रुग्णांचा पॉजिटिव्हिटी रिपोर्ट झाला आहे रिकव्हरी रेट 100% आहे.
बेळगाव जिल्ह्यात कोरोना संक्रमण वाढत असून आता लहान मुलातही याचा प्रादुर्भाव होत आहे.बेळगावात ४६ मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे.ही बाधा झालेली मुले अठरा वर्षाच्या आतील आहेत.
१८ मे पर्यंत वीस मुलांना कोरोनाची बाधा झाली होती.आता ही संख्या ४६ वर पोचली आहे.त्यामुळे आता तिसरी लाट सुरू झाली काय म्हणून जनतेच्या मनात भीती निर्माण झाली आहे.