शहरातील कांही खाजगी हॉस्पिटल्स अव्वाच्या सव्वा बिल आकारून रुग्णांची लुबाडणूक करत असल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने ज्यादा पैसे आकारण्याच्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी 9 सदस्यीय ऑडिट कमिटीची नियुक्ती केली आहे.
बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या आमदारांच्या उपस्थित आज झालेल्या बैठकीत वरीलप्रमाणे ऑडिट कमिटी नेमणुकीचा निर्णय घेण्यात आला. सदर कमिटी आजपासूनच कार्यरत होत आहे. या कमिटीकडून ज्या तक्रारी आल्या आहेत त्यांची शहानिशा केली जाईल.
त्याचबरोबर विविध हॉस्पिटल्सना अचानक भेटी अर्थात सरप्राईज व्हिजिट दिले जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत मुन्याळ यांनी सांगितले. तक्रारी व्यतिरिक्त ऑडिट कमिटी खाजगी हॉस्पिटलमधील बिलांची तपासणी करेल आणि प्रत्येक वेळी त्याचे ऑडिट केले जाणार आहे.
ऑडिट कमिटीमधील सदस्य पुढील प्रमाणे आहेत. डॉ. शशिकांत मुन्याळ (9480188790), डॉ. मिसाळे (9480398025),
डॉ. रमेश दंडगी (9448693443), डॉ. शशिकांत सुंदोळ्ळी (9741262725), डॉ. देवेगौडा इमगौडर (89041226936), डॉ. जगदीश (9972992929), श्रीमती भारती शहापूरकर (9740640943), गिरीश कुलकर्णी (9972139808), मंजुनाथ बसनळ्ळी (9611121906).