बुधवारी बेळगाव जिल्ह्यात आता पर्यंतचा कोरोना रुग्णांचा मोठा आकडा समोर आला आहे. बेळगाव जिल्ह्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेतील मोठी संख्या असून 920 नवीन रुग्ण सापडले आहेत.
केवळ बेळगाव मध्येच मोठा आकडा नव्हे तर राज्यात देखील मोठा आकडा सापडला असून बुधवारी 50112 नवीन रुग्ण सापडले आहेत.
बेळगावात कोरोनाने आणखी दोघांचा बळी गेला असून एकूण कोविड मूळे मयत झालेल्यांची संख्या 367 झाली आहे. एकूण सक्रिय रुग्ण संख्या 4753 झाली आहे.
बुधवारी 198 जण कोरोना मुक्त झाले आहेत.बेळगाव शहर आणि तालुक्यात 461 नव्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती मेडिकल बुलेटिन मध्ये देण्यात आली आहे. अथणी 51,बैलहोंगल 40,चिकोडी 43,गोकाक 55 तर हुक्केरी 41 खानापूर 17,रामदुर्ग 39, रायबाग 63, सौन्दत्ती 69 आणि इतर 21 असे रुग्ण सापडले आहेत.