बेळगाव पोलिसांकडून लॉक डाऊनची अमलबजावणी अत्यंत कडकपणे करण्यात येत आहे. विना मास्क फिरणारे,विनाकारण फिरणारे आणि दुकाने उघडणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा बडगा पोलिसांनी उगारला आहे.
लॉक डाऊन काळात सोमवारी माळ मारुती पोलिसांनी फ्रूट मार्केटमध्ये आठ दुकानावर कारवाई केली .एका चिकन विक्रेत्यांवर शहापूर पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे.
माळ मारुती पोलिसांनी देखील एका चिकन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे .
सोमवारी सात वाहने जप्त करण्यात आली असून विना मास्क फिरणाऱ्या 250 व्यक्तीवर कारवाई केली आहे.
बेळगावात सोमवारी कोरोनाचे 17 बळी
बेळगाव जिल्ह्यात सोमवारी 747 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 738 रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत.
24 मे पर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 17441 झाली आहे. सोमवारी जिल्ह्यात कोरोनाने 17 जण दगावले असून एकूण रुग्ण मयतांची संख्या 459 झाली आहे.
19 मे रोजी सर्वाधिक 2234 रुग्ण सापडले होते तर 21 मे रोजी 971 जण डिस्चार्ज झाले होते.