Monday, November 25, 2024

/

29,30 मे रोजी जिल्हा संपुर्ण लॉकडाऊन

 belgaum

दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आगामी 29 आणि 30 मे रोजी बेळगाव जिल्हा संपुर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे असा आदेश जिल्हाधिकारी डॉ एम जी हिरेमठ यांनी बजावला आहे.

शनिवारी 29 रोजी सकाळी 6 वाजल्या पासून सोमवारी 31 रोजी सकाळी 6 पर्यंत 48 तासांचा कडक विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल असा आदेश हिरेमठ यांनी काढला आहे.

या विकेंड लॉक डाऊन मध्ये दूध औषध खरेदी विक्रीसह केवळ अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील.रेशन दुकाने आणि रयत सेवा केंद्र सकाळी 6 ते 10 या वेळेत सुरू राहतील.या अगोदर परवानगी घेतलेली लग्न समारंभ कोविड नियमावली पाळून करण्यास अनुमती असेल

या विकेंड लॉकडाऊन दरम्यान कुणीही उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचा देखील आदेश बजावले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.