क्षुल्लक कारणावरून येळ्ळूरच्या माजी ग्रा. पं. सदस्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. 18 एप्रिल रोजी या माजी सदस्याला मारहाण झाली होती. त्याला तातडीने खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची नोंद बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
दिनांक 18 एप्रिल रोजी निवडणुकी दरम्यान या माजी ग्रामपंचायत सदस्यला मारहाण करण्यात आले होती. या संबंधी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. किरकोळ कारणातून ही मारहाण झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
येळ्ळूरचे माजी ग्रामपंचायत सदस्य मुकुंद घाडी ( वय 42, रा. परमेश्वरनगर) असे त्यांचे नाव आहे. यांच्यावर दारूच्या नशेत तिघांनी प्राणघातक हल्ला करण्यात होता. घाडी यांच्यावर करण्यात आलेल्या मारहाणीविरोधात तिघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकार रविवारी (18 एप्रिल) रात्री घडला असून मुकुंद घाडी यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत होते. गुरुवारी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
यासंदर्भात त्यांची पत्नी भारती घाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सुनील कुंडेकर, नागराज मजुकर, अनूज कुगजी ( सर्व रा. मारुती गल्ली, येळ्ळूर ) या तिघा जणांवर एफआयआर दाखल करून पोलीस अटक केली आहे. रविवारी रात्री वरील तिघांनी माजी ग्रामपंचायत सदस्य मुकुंद घाडी यांच्याबरोबर वाद काढून शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यामुळे त्यांनी जाब विचारताच तिघांनीही त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले होते.
याप्रकरणी जखमी मुकुंद यांची पत्नी भारती यांनी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर पुढील तपास करत तिघा जणांना अटक केली आहे. जखमी मुकुंद याची प्रकृती गंभीर होती. त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू होते. मात्र उपचाराचा उपयोग न होता त्यांचा गुरुवारी मृत्यू झाला आहे.