Wednesday, May 1, 2024

/

बेळगावात पुन्हा एकदा नीरव शांतता

 belgaum

कोरोना महामारीचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे वीकेंड कर्फ्यु लावण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री नऊ वाजल्यापासून कर्फ्यूला सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळी बेळगाव शहर आणि परिसरात नीरव शांतता पसरली होती.

पुन्हा एकदा कोरोना महामारी वाढल्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आले आहेत. लांबच्या पल्ल्याच्या बसेस सेवा सुरू ठेवण्यात आले आहेत. याबरोबरच दूध औषधी दुकाने पेट्रोल पंप भाजीपाला अशा काही मोजक्याच गोष्टी सकाळी सहा ते दहा या वेळेत सुरू आहेत.

बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ गजबजली असताना विकेंड कर्फ्यू मुळे त्या ठिकाणी नीरव शांतता पसरली होती. सकाळपासूनच पोलिसांनी याबाबतची खबरदारी घेतली होती आणि त्यांना घराबाहेर विनाकारण फिरू नका असे आवाहन पोलिस करत होते.Weekend corfew

 belgaum

दरम्यान एडीजीपी भास्कर राव यांनी शुक्रवारपासूनच शहरात अनेकांना कामाशिवाय बाहेर फिरू नका असे आवाहन केले होते. याचबरोबर पोलिसांना बळाचा वापर न करता विश्वासात घेऊन नागरिकांना सांगा आणि वीकेंड कर्फ्यू पाळा असे आवाहन त्यांनी केले होते. त्या दृष्टिकोनातून बेळगाव शहर आणि परिसरात वीकेंड सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळपासूनच कोणीच बाहेर फिरताना दिसत नव्हते.

 

दरम्यान एपीएमसी भाजी मार्केट मध्ये सकाळी काही प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र काही वेळा नंतर तेथेही शांतता पसरली होती. येथे एपीएमसीमध्ये भाजीपाला घेण्यासाठी वाहनांची गर्दी दिसून आली. याचबरोबर काही किराणा दुकानांवर ही नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आली. मात्र दहानंतर सर्वत्र शांतता पसरली होती.

पोलीस चौकाचौकात बंदोबस्त ठेवत होते. अनेक ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद केले होते. याचबरोबर बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना आवाहन करत होते. त्यामुळे वीकेंड कर्फ्यू मुळे सर्वत्र शांतता पसरली होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.