तेलसंग सेल्स अँड तेलसंग ट्रॅव्हल्सचे मालक प्रदीप कुमार तेलसंग यांच्यावर खासबागमधील कन्नड प्राथमिक शाळा क्रमांक ३ च्या शिक्षकांनी व इतरांनी हल्ला केला आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रदीपकुमार यांनी शहापूर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
विद्यार्थ्यांची शाळा आणि टीसी विषयाबाबत व्यावसायिक प्रदीपकुमार यांनी खासबागातील सदर कन्नड प्राथमिक शाळेतील शिक्षकांशी विचारणा केली. शिक्षक वीरप्पा घट्टद, मुख्याध्यापक सतीश ढवळी आणि सोमशेखर मारीहाळ यांनी प्रदीपवर आपण काय मागत आहात आणि आपला काय संबंध आहे? असे म्हणत त्यांच्यावर हल्ला केला आहे.
प्रदीप कुमार तेलसंग यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा शर्ट फाडण्यात आला असून यावेळी झालेल्या वादावादीत अर्वाच्च भाषा वापरत त्यांच्या अंगावरील ११० ग्रॅम वजनाची सोनसाखळी तोडण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. खासगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रदीपकुमार यांनी शहापूर ठाण्यात तक्रार दाखल केली असून दोषी शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रदीपकुमार यांनी केली आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.