Tuesday, December 3, 2024

/

दहावी, बारावी परीक्षा रद्द संदर्भात कोणताही निर्णय नाही : शिक्षण मंत्री

 belgaum

कर्नाटकात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत चालली आहे. कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत चालली असून या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नसून याबाबत गैरसमज नको.

या परीक्षा नेहमीप्रमाणे होणारच, अशी माहिती प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली.

शुक्रवारी चामराजनगर येथे पत्रकारांशी बोलताना सुरेशकुमार यांनी हे स्पष्टीकरण दिले असून ते पुढे म्हणाले, दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सध्या घेण्यात आला नसून यासंदर्भातील निर्णय आणि माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल.

कोरोनाच्या वाढत्या थैमानामुळे काही राज्यात बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.