नैऋत्य रेल्वेतर्फे 24 पदासाठी स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
मागील वर्षी निवृत्त रेल्वेच्या स्पोर्ट्स असोसिएशनने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे आता पुन्हा स्पोर्ट्स कोट्यासाठी भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे.
पाच स्पोर्ट्समन अर्थात क्रीडापटू (बॉडी बिल्डिंग 2, पॉवरलिफ्टींग 3). चार स्पोर्ट्समन (बॅडमिंटन 1, अथलेटिक्स 2, वेटलिफ्टिंग 1). पंधरा स्पोर्ट्समन (अथलेटिक्स 4, बॅडमिंटन 2, क्रिकेट 3, हॉकी 4, वेटलिफ्टिंग
2). सदर एकूण 24 पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. यासंदर्भात इच्छुकांनी अधिक माहितीसाठी नैऋत्य रेल्वेच्या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.