17 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा पोट निवडणुकीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं शुभम शेळके यांना अधिकृत उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.शिवसेनेचे उमेदवार के पी पाटील हे उद्या माघार घेणार असून शेळके यांना बेळगाव शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपूर्ण झाली असून शनिवार दिनांक ३ एप्रिल हि अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना या दोन्ही संघटनांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकाच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्णय मध्यवर्ती, शहर, तालुका समिती आणि शिवसेनेच्या बैठकीत घेण्यात आला होता.
परंतु आजच्या दिवसापर्यंत मध्यवर्ती किंवा शिवसेनेने अधिकृत उमेदवाराच्या घोषणेबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. दरम्यान शिवसेनेच्या वतीने के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्याचप्रमाणे युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनीही उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु शिवसेनेच्या आज झालेल्या बैठकीत के. पी. पाटील यांचा अर्ज मागे घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली मध्यवर्ती अध्यक्ष दळवी यांची भेट घेऊन शेळके यांना पाठिंबा देण्याचा निर्णय कळवला होता त्यानुसार मध्यवर्तीने शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.
शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत के. पी. पाटील यांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख असून त्याचदिवशी सीमाभागातील मराठी भाषिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवाराच्या नावावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाला आहे.
संपूर्ण सीमाभागाचा कौल पाहता शुभम शेळके यांना मतदारांनी अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे शुभम शेळके यांचे नाव मध्यवर्ती समितीच्या वतीने अधिकृतरीत्या जाहीर झाले आहे.