आपल्या विविध मागण्यांसाठी परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अद्यापही सुरूच आहे. आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, तोवर हा संप सुरूच राहील, यानंतर जेलभरो आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा परिवहन कामगार संघटनेने दिला आहे.
दरम्यान या संपाचा परिणाम बेळगाव वर अधिक दिसून येत नसून सुमारे ४० मार्गांवर सुरळीतपणे बससेवा सुरु आहे.
सोमवारपासून जेलभरो आंदोलन पुकारलेल्या परिवहन कामगारांनी आपला संप असाच सुरु राहणार असल्याचे म्हटले आहे. परंतु अनेक परिवहन कर्मचाऱ्यांनी गणवेशाव्यतिरिक्त सध्या पोशाखात पुन्हा एकदा सेवेत रुजू होऊन बससंचार सुरु करण्यास सरकारला मदत केली आहे.
बेळगावमधील बससेवा देखील सुरु असून एकूण ४० मार्गांवर बससेवा सुरळीत सुरु आहे.निपाणी, बैलहोंगल, हुक्केरी, चिकोडी, धारवाड, हुबळी, सवदत्ती, रामदुर्ग यासह अनेक विविध मार्गावर बससेवा सुरु आहे.