महाराष्ट्रात कोरोनाविषाणूने सर्व क्षेत्रावर अवकळा आणले आहे. दिवसागणिक हजारो जण कोरोणा बाधित होत असल्याने महाराष्ट्र सरकारने नियमांमध्ये कठोरता आणली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर नियम अमलात आणले आहेत.
बाहेरील राज्यातून आज प्रवेश करताना इ पाच शक्तीची केला आहे. त्यामुळे यापुढे महाराष्ट्र जाताना ई पास घेऊनच जावे लागणार आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे ही चेन तोडण्यासाठी पुन्हा एकदा ब्रेक दी चेन अंतर्गत नियमांचे अंमलबजावणी सुरू केली आहे.
परिणामी बाहेरील राज्यातील नागरिकांना प्रवेश करण्यासाठी राज्य सरकारने ही इ पास सक्तीची केली असल्याने यापुढे महाराष्ट्र जाणेही अवघड होणार आहे. इ पास शिवाय आत प्रवेश देण्यात येणार नाही असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे कोरोनाची चेन तोडण्यासाठी हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत असून त्यावर आळा घालण्यासाठी संबंधित राज्य सरकारने पंधरा दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या दरम्यान आता बाहेरील राज्यातून जाणाऱ्या नागरिकांनाही ती तरतूद केल्यामुळे अनेकांची गोची झाल्याचेही समजते. मात्र कोरोना थोपवण्यासाठी राज्य सरकारने उचललेले पाऊल योग्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य अंतर्गत आणि संबंधित जिल्ह्यांतर्गत नागरिकांना ई पासची आवश्यकता भासणार आहे. याचबरोबर ई पास साठी रितसर अर्ज करून तो घेणे बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे हा नियम आणखीन कठोर करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. सीमावर्ती भागातील नागरिकांना यापुढे आता मोठी गोची निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र कोरोना थोपवण्यासाठी घेतलेले निर्णय योग्य असतील असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
https://covid19.mhpolice.in