शुभम शेळके बनताहेत “लोकनेते” : जनतेकडूनच मिळतोय मदतीचा हात

0
4
Shubham mes
 belgaum

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता रंगात येऊ लागला असून भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. या पार्श्वभूमीवर दुसर्‍या बाजूला सर्वसामान्य कुटुंबातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके हे “लोकनेते” बनू लागले असून त्यांच्या प्रचार कार्यासाठी लोकांकडूनच मदतीचा उस्फुर्त ओघ सुरू झाला आहे.

भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आदी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना निवडणुकीत प्रचारासाठी पक्षाचा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असतो. कारण मोठमोठे उद्योजक या पक्षांचे पाठीराखे आहेत. लोकसभेसारख्या निवडणुकीमध्ये तर हे राष्ट्रीय पक्ष पाण्यासारखा पैसा खर्च करतात.

त्यामुळेच राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांचा प्रत्येक निवडणुकीमध्ये फार मोठा गवगवा असतो. त्यामानाने प्रादेशिक -स्थानिक उमेदवार सर्वार्थाने योग्य असून देखील आर्थिक समीकरणांमध्ये कमी पडतात. नेमकी ही बाब ध्यानात घेऊन बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक जनतेने महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांच्या स्वरूपात आपला आवाज पुन्हा एकदा बुलंद करण्यासाठी कंबर कसली असून शेळके यांना आर्थिक मदतीचा हात देऊ केला आहे.

 belgaum

सर्वसामान्य कुटुंबातील शुभम शेळके हे एक लघुउद्योजक आहेत. त्यांची काही राजकीय पार्श्वभूमी देखील नाही किंवा त्यांना कोणाचा आर्थिक वरदहस्त देखील नाही. तथापि त्यांची बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय दूर करण्याबाबतची तळमळ तसेच जनतेच्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी सुरू असलेली धडपड लक्षात घेऊन या निवडणुकीत जनताच त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

निवडणूक लढायची म्हणजे प्रचार दौरा, दौऱ्यासाठी येणारा वाहनांच्या इंधनाचा खर्च, कार्यकर्त्यांचे जेवण-खान, प्रसारमाध्यमांच्या जाहिराती, जाहिरातीचे फलक आदींसाठी चिक्कार खर्च करावा लागतो. आज-काल साधी ग्रामपंचायत निवडणूक लढवायची असली तरी लाखाच्या हिशोबात खर्चाचा ताळमेळ घालावा लागतो. सध्याची निवडणूक तर लोकसभेची निवडणूक आहे. हे ध्यानात घेऊन शहरासह ग्रामीण भागातील जनता शुभम शेळके यांच्या मदतीला धावून आली आहे.Shubham mes

शुभम शेळके हे फक्त युवा व्यक्तिमत्व नसून निस्वार्थ, अभ्यासू , प्रगल्भ आणि परखड व्यक्तिमत्त्व आहे. आजच्या घडीला फक्त मराठी भाषिक जनताच नाही तर समस्त समाजाच्या हितासाठी अशा व्यक्तिमत्त्वाची गरज असल्याची प्रतिक्रिया सध्या सर्वत्र व्यक्त होत आहे. यासाठीच शुभम शेळके यांना उस्फूर्तपणे मदतीचा हात दिला जात आहे. गेल्या दोन दिवसांपुर्वी मुतगा (ता. बेळगाव) गावापासून शुभम शेळके यांना उस्फुर्त आर्थिक तसेच अन्य मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे. मुतगा गावानंतर निलजी, गांधिनगर, कंग्राळी, कपलेश्वर रोड परिसर, तांगडी गल्ली परिसर, म. ए. महिला आघाडी, शहापूर भाग आदी परिसरातून शुभम शेळके यांना उस्फुर्त आर्थिक मदत करण्यात आली आहे. एकंदर फारसा गाजावाजा नसतानादेखील शुभम शेळके यांना सर्व थरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे.

मंगळवारी बेनकनहळळी येथील प्रचार सभेत साधना सागर पाटील यांनी 25 हजार संतोष मंडलिक यांनी 5 हजार रुपयांची मदत दिली असे अनेक जण शुभम यांच्या निवडणूक मदतीसाठी पुढे येताहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.