Saturday, December 21, 2024

/

सलून व्यवसायिक संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

 belgaum

कोरोना प्रादुर्भाव थोपविण्यासाठी जीवनावश्यक वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचा जो आदेश काढण्यात आला आहे तो शिथील करून केस कापण्याची दुकाने अर्थात सलून दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली जावी, अशी मागणी श्री संतसेना महाराज समाजोन्नती संघ सलून व्यवसायिक संघटनेने केली आहे.

श्री संतसेना महाराज समाजोन्नती संघ सलून व्यवसायिक संघटना शहापूरतर्फे उपरोक्त मागणीचे निवेदन आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध घातले असून आज 27 एप्रिल रोजी रात्रीपासून सलग 14 दिवस कर्फ्यू लागू केला आहे. या कालावधीत नागरिकांच्या अनुकूलतेसाठी फक्त जीवनावश्यक साहित्याची दुकाने सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

उर्वरीत अन्य दुकानांतसह नाभीकांची सलून दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. यामुळे आम्हा सलून चालकांवर संकट कोसळणार आहे. कारण या व्यवसायावरच आमचा उदरनिर्वाह चालतो. शिवाय बहुतांश नाभिक मंडळी भाड्याच्या जागेत आपले सलुन दुकान चालवतात. तसेच भाड्याच्या घरात राहतात.Saloon association

त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाबरोबरच सलून दुकाने बंद झाल्यास भाड्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. तेंव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये सलून दुकाने देखील सुरू करण्यास परवानगी दिली जावी, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.

निवेदन सादर करतेवेळी सलून व्यावसायिक संघटना शहापूरचे सेक्रेटरी संतोष शिवणगेकर, राजेंद्र सूर्यवंशी, उमेश मुगळीकर, संजय भोगुलकर, सुनील सारंग, संदीप जाधव, प्रसाद सपकाळ, गोपाळ भोगुलकर, अमर कडगावकर, गोपाळ शिवणगेकर आदींसह संघटनेचे अन्य सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.