Saturday, December 28, 2024

/

राज्यात नव्याने आढळले तब्बल 39 हजार रुग्ण : आणखी 229 जणांचा झाला मृत्यू

 belgaum

राज्यातील कोरोना च्या दुसऱ्या लाटेची भीषण तीव्रता रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना काल मंगळवारी रात्री 11:59 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 39,047 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कर्नाटकातील कोरोना बाधितांची एकूण संख्या सध्या 14 लाख 39 हजार 822 इतकी झाली असून आणखी 229 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात 11,833 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकूण रुग्णांची संख्या 10,95,883 इतकी झाली आहे. काल मंगळवार दि. 27 एप्रिल रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 39,047 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 14,39,822 इतकी झाली आहे. राज्यात सध्या 3,28,884 ॲक्टिव्ह अर्थात सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी 2192 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

राज्यभरात नव्याने 229 जणांचा मृत्यू झाला असून राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 15,036 झाली आहे. राज्यात हवाईमार्गे आलेल्या 3 लाख 47 हजार 755 प्रवाशांचे आतापर्यंत स्क्रिनिंग झाले आहे. दरम्यान, गेल्या 25 नोव्हेंबर 2020 पासून आत्तापर्यंत ब्रिटनहून 18,927 प्रवासी राज्यात आले आहेत.

*31,436 झाली बेळगावची संख्या*
दरम्यान, बेळगाव जिल्ह्यात आज बुधवारी नव्याने 360 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून यापैकी तब्बल 291 रुग्ण एकट्या बेळगाव तालुक्यातील आहेत. परिणामी जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 31,436 इतकी झाली आहे.

बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार आज बुधवार दि. 28 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगांव जिल्ह्यात एकूण 6,83,164 व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. जिल्ह्यात 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 58,122 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 2,433 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 41,401 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 5,81,208 आहे.

कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 6,82,072 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 31,436 नमुन्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये आज बुधवारी नव्याने आढळलेल्या 360 जणांच्या अहवालांचा समावेश आहे. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 6,34,439 नमुने निगेटिव्ह असून जिल्ह्यात सक्रिय रुग्ण (ॲक्टिव्ह केसीस) 2,433 आहेत. त्याचप्रमाणे 12,560 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 360 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 28,643 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त झाल्याने त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज बुधवारी आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये बेळगाव तालुक्यातील 291, सौंदत्ती 23, बैलहोंगल 15, गोकाक 9, खानापूर, अथणी, व रायबाग प्रत्येकी 4, रामदुर्ग 3, चिकोडी व हुक्केरी प्रत्येकी 2 आणि इतर 3 अशा एकुण 360 रुग्णांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.