बेळगाव विमानतळावरून गेल्या जानेवारी 2021 पासून आतापर्यंत 39 हजार 63 प्रवाशांनी देशातील वेगवेगळ्या शहरांचा प्रवास केला असल्याची माहिती डीजीसीए प्रसिद्धीस दिले आहे.
बेळगावहून सर्वाधिक प्रवासी प्रवास करणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये हैदराबाद अद्यापही आपला प्रथम क्रमांक टिकवून आहे. हैदराबाद खालोखाल अनुक्रमे बेंगलोर, मुंबई, कडप्पा आणि म्हैसूर या शहरांचा क्रमांक लागतो. गेल्या जानेवारी 2021 पासून आतापर्यंत बेळगाव विमानतळावरून विविध शहरांना प्रवास केलेल्या प्रवाशांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेळगाव ते हैदराबाद -12750, बेळगाव ते बेंगलोर -8880, बेळगाव ते मुंबई -5270, बेळगाव ते कडप्पा -3051, बेळगाव ते म्हैसूर -2238, बेळगाव ते तिरुपती -1586, बेळगाव ते अहमदाबाद -1535, बेळगाव ते पुणे -1454, बेळगाव ते इंदोर -1003, बेळगाव ते सुरत -795, बेळगाव ते चेन्नई -340, आणि बेळगाव ते नाशिक -155. या पद्धतीने एकूण 39,063 प्रवाशांनी बेळगाव होऊन उपरोक्त शहरांचा प्रवास केला आहे.
वरील मार्गांपैकी शेवटच्या चार मार्गांवरील विमान फेऱ्यांची संख्या कमी झाल्याने प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. बेळगाव -नाशिक विमान सेवा आठवड्यातील 3 दिवसासाठी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बेळगाव -चेन्नई विमानसेवा 5 दिवसासाठी, बेळगाव -सूरत विमानसेवा महिन्यातील 13 दिवसांसाठी आणि बेळगाव -इंदोर विमान सेवा महिन्यातील 12 दिवस अशी कमी करण्यात आली आहे.