बेळगाव शहरातील कोल्हापूर सर्कल जवळील रामदेव हॉटेलसमोर हेरॉईन हे मादक पदार्थ विक्रीसाठी गोव्याला विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या तीन आरोपींना एनडीपीसीआयडी पोलीस निरीक्षक एन. व्ही. बरमणी यांनी अटक केली होती.
या तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जून २०१६ रोजी झालेले हे प्रकरण दुसऱ्या जिल्हा अधिक सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट होते. या प्रकरणावर न्यायाधीश जी. नंजुडय्यानावर यांनी सुनावणी करत तिन्ही आरोपींना शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणातील (१) शिवकुमार लिंगय्या हिरेमठ (वय ३८, रा. अमीनगड, जि. बागलकोट), (२) अंबरहुसेन गफूसाब मसापती (वय ५०, रा. अमीनगड), (३) परशुराम हणमंत नायक (वय ३१, रा. अमीनगड), आणि (४) राजाराम शशिकांत सुखी (वय ३२, रा. गोवा) या आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना १५ वर्षांचा सक्त कारावास आणि पाच लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांच्याजवळ ३६० ग्राम वजनाचा सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला होता.
यामधील आरोपी क्रमांक १ याला १५ वर्षांचा सक्त कारावास आणि पाच लाख रुपये दंड, तसेच आरोपी क्रमांक ३ आणि ४ यांना १० वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी १ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यातील आरोपी क्रमांक ३ याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात एकूण ८ साक्षी आणि २८ पुराव्यांची नोंद करण्यात आली आहे. सरकारी वकील म्हणून जि. के. माहूरकर यांनी काम पाहिले.