राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध काय आहेत? काय सुरु? काय बंद?जाणून घ्या बेळगाव लाईव्ह सोबत
कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती अत्यंत विदारक होत चालली असून दुप्पट वेगाने रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. लॉकडाऊन संबंधीची नवी नियमावली सोमवारी जाहीर करण्यात आली असून मंगळवार दिनांक २७ एप्रिल रोजी रात्री ९ पासून या नियमांची अंमलबजावणी सुरू होणार आहे. २७ एप्रिल रोजी रात्री ९ ते बुधवार दिनांक १२ मे रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत सलग १४ दिवस हा लॉकडाऊन असणार आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यात १२ मेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारने तयार केलेले नवे निर्बंध उद्यापासून लागू असतील.
अत्यावश्यक सेवांना या लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा सकाळी ६ ते सकाळी १० पर्यंत अर्थात ४ तास सुरु असतील. त्यानंतर दुकानं बंद असतील. याव्यतिरिक्त इतर सेवा पूर्णपणे बंद असतील तर बांधकाम, शेती आणि उत्पादन क्षेत्राला परवानगी आहे. सार्वजनिक वाहतूक बंद असेल. उद्यापासून रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत रात्रीची संचारबंदी असेल. गर्दी केल्यास कलम १४४ नुसार कारवाई होणार आहे.
काय बंद ?
* शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, हॉटेल, थिएटर, मनोरंजन पार्क, व्यायामशाळा, जलतरण, माॅल, जिम, क्रीडा संकुल, सामाजिक/राजकीय/सांस्कृतिक समारंभ. अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने बंद राहतील.
* बांधकाम सुरू राहील. (कंटेनमेंट झोन बाहेर)
* रेल्वे सेवा चालू राहील.
* मॉल, जीम, आस्थापने, चित्रपटगृहे बंद राहतील.
* खेळाची मैदाने, सर्व सरकारी वाहतूक व्यवस्था बंद राहणार (बस आणि मेट्रो)
* सर्व धार्मिकस्थळे (मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च अन्य ठिकाणे)
* उद्योगधंदे आणि कारखाने सुरु राहतील (गारमेंट सोडून)
काय सुरु?
* किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दूध डेअरी, बेकरी, मिठाई आणि खाद्य दुकाने हॉटेल्स, रेस्टॉरंट टेक अवे सुरुच राहतील.
* शेतीमालाच्या विक्रीलाही परवानगी.
* मासेमारीला आणि पशुसंवर्धनाशी संबंधिक सर्व गोष्टींना परवानगी.
* ठरलेल्या परीक्षा घेण्यास परवानगी
* आर्थिक क्षेत्र खुलं राहणार – बँका, NBFC कंपन्या, विमा आणि भांडवली बाजार, सहकाही संस्था सुरू राहणार.
* राज्यातील सर्व उद्योग चालू राहणार, उद्योग क्षेत्रातील कामगारांवर कुठलेही निर्बंध असणार नाहीत.
* सर्व बांधकामे सुरु राहतील.
* सरकारी ठेके असलेली कामेही सुरु राहणार.
* सरकारी कार्यालये सुरु
* भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसतील.
* केवळ गर्दी कमी करण्यासाठी कठोर नियम.
* लग्न समारंभ (केवळ ५० लोकांची मर्यादा) – अंत्यसंस्कार, दशक्रिया विधीसाठी ५ जणांना परवानगी.
* खासगी ऑफिसेससाठी वर्क फ्रॉम होम सुविधा असावी
* टॅक्सी आणि ऑटो रिक्षा (emergency)
* रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सना पार्सल आणि टेक अवे सुविधा देण्याची परवानगी असेल.
* सार्वजनिक व खाजगी जीवनावश्यक सेवांची तथा इतर वाहतूक (उदा. दूध, किराणा माल,पेट्रोल, डिझेल,गॅस, उद्योगांना इ.) सुरु राहील.
लॉकडाऊन 2-0 अशी आहे नियमावली- काय सुरू काय बंद पहा खालील लिंक मधील तक्त्यात
https://www.instagram.com/p/COIyfXrhMBC/?igshid=23alzdreb3hk