निवडणूक कर्तव्यात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी दिला. निवडणूक कार्यासाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली किंवा प्रशिक्षणादरम्यान गैरहजेरी दर्शविली तर त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
१७ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांसाठी पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी काही कर्मचारी हजर नव्हते. या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या प्रशिक्षणात हजर राहणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पुढीलवेळी कर्मचारी गैरहजर राहिले, तर त्यांच्यावर कठोर आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी दिला. यापुढील काळात होणाऱ्या सर्व प्रशिक्षण शिबिरात प्रत्येक कर्मचाऱ्याने हजर राहणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.