Wednesday, November 27, 2024

/

सुरेश अंगडी यांनी शेवटच्या श्वासा पर्यन्त विकासाचा ध्यास साधला होता

 belgaum

दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी अखेरच्या श्वासापर्यंत केवळ जनतेला मदत करण्याचा ध्यास बाळगला होता. दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार घेत असताना देखील त्यांनी आपला मोबाईल आपल्या सोबतच ठेवला होता.उपचार घेत असताना देखील जनतेचे फोन स्वीकारूनत्यांच्या समस्यांचे निराकरण केले .जनतेच्या समस्या सोडवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे असे रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी सांगितले होते.त्यांनी स्वतःची थोडी काळजी घेतली असती तर आज देखील ते मंत्रिपद सांभाळून जनतेची सेवा करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले असते असे त्यांची कन्या श्रध्दा अंगडी शेट्टर यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले.
आपले वडील बेळगावात असो किंवा दिल्लीत ते नेहमी आपला मतदार संघ आणि जनता यांचाच विचार करायचे.आपल्याकडे लोक काम घेवून काम होईल या अपेक्षेने येतात.त्यामुळे आपण त्यांना प्रतिसाद दिलाच पाहिजे.मतदार संघातील अनेक लोक सकाळी घरच्या कार्यालयात आपल्या समस्या आणि कामासाठी यायचे.त्यांना भेटण्यासाठी वडिलांनी वेळ राखून ठेवली होती.त्यांचे म्हणणे ऐकून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे व्रत त्यांनी अखेरपर्यंत पाळले.वडिलांचे निधन झाल्यावर अनेक जण आपल्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी येत होते.त्यावेळी अनेकांनी साहेब दिल्लीत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते त्यावेळी आम्ही त्यांना कामासाठी फोन केला होता.उपचार घेत असताना देखील संबंधितांशी फोनवरून बोलून साहेबांनी आमचे काम करून दिले असे अनेक लोकांनी डोळ्यात अश्रू आणून आम्हाला सांगितले.
खासदार फंड,केंद्र सरकारचा फंड आणि राज्य सरकारच्या फंडातून त्यांनी अनेक विकास कामे केली होती.अनेक जणांच्या विवाहासाठी,अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातून मदत केली.मंत्रिपद मिळालेल्या पासून तर त्यांच्या कार्याचा आवाका वाढला होता.सकाळी घरातून लवकर बाहेर पडायचे आणि रात्री उशिरा ते घरी परत यायचे.वेळेवर जेवण करणे विश्रांती घेणे याकडे त्यांनी लक्ष न देता जनतेची सेवा करण्याचा ध्यासच त्यांनी घेतला होता.अनेकदा घरगुती कार्यक्रमात देखील ते अगदी थोडा वेळ उपस्थिती दर्शवून बाहेर पडायचे.लोकांना साहेबांच्या बद्दल विश्वास होता आणि साहेब आपले काम नक्की करणार याची जनतेला खात्री होती.त्यामुळेच जनतेचे प्रेम साहेबाना मिळाले.मोबाईल वर अ न नोन नंबर आला तरी ते फोन घेवून त्या व्यक्तीला प्रतिसाद देत असत असे सांगून श्रध्दा शेट्टर अंगडी यांनी निवडणुकीच्या निमित्ताने वडिलांच्या स्मृतींना उजाळा दिला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.