बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी रविवारी (दि. १८) वंटमुरी येथे कोरोना लस घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लस सुरक्षित असून प्रत्येकाने या लसीकरणाचा लाभ घ्यावा, आरोग्याच्या दुर्ष्टीकोनातून लस घेणे उत्तम आहे. शिवाय ४५ वर्षाहून अधिक असलेल्या जनतेने लसीबाबत कोणताही संभ्रम न बाळगता लास घ्यावी , असे आवाहन केले. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर कन्नड येथे पहिल्या टप्प्यातील लस घेतली आहे. त्यानंतर ८ आठवड्यांनी बेळगावमध्ये त्यांनी दुसऱ्या टप्प्यातील लस घेतली आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी या लसीकरणासंदर्भात माहिती दिली. लसीकरणाचे कोणतेही दुष्परिणाम तब्येतीवर होत नसून जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला आहे.
अनेक नागरिक उत्साहाने लसीकरणात सहभाग दर्शवत आहेत. जिल्ह्यात लसींचा तुटवडा पडणार नाही, याची काळजी घेण्यात येत असून दररोज ३० हजार नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. नागरिकदेखील लसीकरणासाठी पुढे सरसावत आहेत. परंतु अद्यापही अनेक नागरिकांमध्ये याबाबत संभ्रम आहे. अशा नागरिकांनी कोणताही संशय न बाळगता लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी केले.
कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. अनेकवेळा नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगण्यात येत आहे. परंतु अनेक नागरिक विनामास्क फिरताना आढळून येत आहे. येणारा काळ हा कोविडसंदर्भात थोडा धोकादायक आहे. यासाठी प्रत्येकाने खबरदारी बाळगावी, असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले.