बेळगाव जिल्ह्यात परगावाहून आलेल्या आणि आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नजीकच्या तालुका हॉस्पिटल अथवा आरोग्य केंद्रामध्ये स्वतःची कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. के. हरीशकुमार यांनी केले आहे.
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे आपल्या कुटुंबासह सामाजिक आरोग्याच्या हितासाठी परगावच्या नागरिकांनी पुढाकार घेऊन तात्काळ स्वतःची कोरोना तपासणी करून घ्यावी.
कारण या तपासणीत कोरोना संसर्ग आढळून आल्यास वेळेवर उपचार करून कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यास मदत मिळणार आहे.
यासाठी आठवडाभरापेक्षा जास्त कालावधीसाठी जिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या परगावच्या लोकांनी स्वतःची आरोग्य तपासणी करून घ्यावी. जेणेकरून वेळेवर लवकर कोरोना संसर्गाचा पत्ता लागू शकेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आवाहनात म्हंटले आहे.