शनिवारी प्रसूती शस्त्रक्रिया केलेल्या महिलेची रुग्णालयातून सुटका करण्यासाठी लाच मागणार्या बैंलहोगल तालुक्यातील सरकारी रुग्णालयाचे सर्जन एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.
एसीबीच्या अधिकार्यांनी लाचलुचपत प्रकरणी रंगेहाथ डॉक्टरला ताब्यात घेतले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. डॉक्टर डॉ. विरेंद्र कुचबाळ असे एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या डॉक्टरांचे नाव आहे.
प्रसूती झालेल्या कित्तूर तालुक्यातील दास्तीकोप्प येथील एका महिलेला रुग्णालयाच्या प्रसूतिगृहात हलविण्यात आले होते. त्या महिलेवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी डिस्चार्ज देण्यासाठी 7,000 रुपयांची मागणी केली.
लाच देण्यास उशीर झाल्याने महिलेला रुग्णालयातून सोडण्यात आले नाही. डॉक्टरांच्या वागण्यामुळे हैराण झालेल्या या महिलेचा पती यल्लाप्पा कोलकार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती.
डॉ. विरेंद्र कुचबाळ यांना लाच घेताना पकडलेअसून एसीबीचे एसपी बीएस न्यामगौडार यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी जे. एम. करुणाकर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक एच. एच. सुनीलकुमार, ए. एस. गुडिकोप्प आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई पार पाडली.