महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांच्या संख्येत घट झाल्यामुळे याचा परिणाम वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या महसुलावर झाला असून तो निम्म्यावर घटला आहे.
महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. याचा परिणाम प्रवाशांच्या संख्येवर झाला असून घटलेल्या प्रवासी संख्येचा फटका कर्नाटक परिवहन मंडळाला बसला आहे. गेल्या महिन्याभरापासून कोगनोळी टोल नाक्यावर प्रवाशांची तपासणी केली जात आहे.
महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या रोडावली आहे. बेळगाव विभागातून महाराष्ट्रात दररोज 149 हून अधिक बस गाड्या धावतात. मात्र सध्या महाराष्ट्र व इतर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अचानक वाढल्यामुळे कर्नाटक सीमेवर चोख बंदोबस्त ठेवून नागरिकांची तपासणी केली जात आहे.
कर्नाटकातून महाराष्ट्रात धावणाऱ्या बसच्या माध्यमातून वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र आता दोन्ही राज्यांच्या सीमेवर नागरिकांची तपासणी केली जात असल्याने प्रवाशांची संख्या फारच कमी झाली आहे. याचा परिणाम परिवहन मंडळाच्या महसुलावर झाला असून तो निम्म्यावर घटला आहे.
गेल्या वर्षापासून परिवहन मंडळाला कोरोनाचा मोठा फटका बसत आहे. मागील वर्षी कोरोनामुळे वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाला तब्बल 110 कोटी रुपयांचा फटका तोटा सहन करावा लागला होता. अनलॉक नंतर बस सेवा सुरू झाली आणि थोड्या फार प्रमाणात महसुलात वाढ होत असतानाच परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन झाले आणि आता पुन्हा कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळ अडचणीत आले आहे.