बेळगाव शहर पोलिसांची कोविड टीम-कोविड संदर्भातील सरकारी मार्गसूची आणि पोलीस खात्याच्या सूचनेनुसार बेळगाव शहर पोलिसांच्या वतीने सहा कोविड टीम तयार केल्या आहेत.
या सहा टीम प्रत्येक उपविभागासाठी कार्यरत राहणार असून या टीममध्ये एक पीएसआय आणि प्रमाणित पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
या कोविड टीम सरकारी विभागांच्या समन्वयात चोवीस तास कार्यरत राहणार आहेत.
एसीपी आणि डीसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली या टीम कार्यरत राहणार असून कोविड मार्गसूचीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर पाऊले उचलण्यात येणार आहेत.