गेले दोन दिवस मी तिथेच असून बेळगावच्या परिस्थितीशी परिचित आहे. येत्या 14 तारखेला मी पुन्हा बेळगावला येणार असून बेळगावात रोड शो करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिली.
भाजप उमेदवार मंगला अंगडी यांच्यासाठी दोन दिवस प्रचार कार्य केल्यानंतर बेंगलोरला परत चाललेल्या मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वरील माहिती दिली. काल -परवा मी इथेच होतो आणि बेळगावची परिस्थिती माझ्या परिचयाचे आहे.
मात्र ज्या प्रकारे सुरेश अंगडी 4 लाख मतांनी जिंकले होते, त्याच प्रकारे त्यांच्या पत्नी मंगला अंगडी विजयी होतील असा मला विश्वास आहे असे सांगून येत्या 14 एप्रिलला मी पुन्हा बेळगावात येणार आहे. पुन्हा प्रचार करणार आहे आणि बेळगावात रोड शो देखील करणार आहे असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सांगितले.
काँग्रेस आमच्यावर जी कांही टीका करत आहे, किंवा अन्य कोणीही टीका करत आहे. त्यांना ती करू देत. त्यासाठी आपले डोके खराब करून घेण्याची गरज नाही. जनता आमच्या पाठीशी आहे आणि मी केलेल्या चांगल्या कार्याला ती पाठिंबा देईल असा माझा विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.