Wednesday, January 8, 2025

/

पोटनिवडणूक मतमोजणी : पार्किंगची सोय; वाहतूक मार्गात बदल

 belgaum

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी टिळकवाडी येथील आरपीडी कॉलेजमध्ये रविवार दि. 2 मे 2021 रोजी होणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या निवडणुक अधिकारी व कर्मचाऱ्यांसह उमेदवार, एजंट, वार्ताहर आणि प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी यांच्या वाहनांसाठी पार्किंगची खास व्यवस्था करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

मतमोजणी केंद्राच्या ठिकाणची पार्किंगची सोय पुढील प्रमाणे असणार आहे. उमेदवारांनी आपली वाहने आरपीडी कॉलेजच्या पहिल्या गेटमधून प्रवेश केल्यानंतर कॉलेजच्या कार्यालयीन इमारती शेजारी पार्क करावीत. तसेच उर्वरितांनी आपली वाहने शेजारील मैदानात पार्क करावीत. माध्यम प्रतिनिधींनी आपली वाहने भाग्यनगर दुसरा क्रॉस येथून लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीच्या मार्गाने तेथील अमराईतून आरपीडी कॉलेज मैदानावर आणून पार्क करावीत. उमेदवारांचे एजंट तसेच मतमोजणी केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली वाहने भाग्यनगर दुसरा क्रॉस येथून लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीच्या मार्गाने तेथील आमराईतून आरपीडी कॉलेज मैदानावर पार्क करून मतमोजणी केंद्रात जावे.

मतमोजणी दिवशी गोवावेस सर्कल पासून अनगोळ क्रॉस येथील बिग बाजारपर्यंतच्या अटल बिहारी वाजपेयी मार्गावर (खानापूर रोड) दोन्ही बाजूला वाहनेऐ पार्क करण्यास मनाई असणार आहे. त्याचप्रमाणे मतमोजणी दिवशी काही मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार असून ती खालील प्रमाणे असेल.Counting byelection

शहापूरकडून येणाऱ्या आणि गोवावेस सर्कल व आरपीडी क्रॉसमार्गे खानापूर, पिरनवाडीच्या दिशेने जाणाऱ्या खाजगी वाहनांचा मार्ग बदलून तो गोवावेस सर्कल, शुक्रवारपेठ टिळकवाडी मार्गे पहिले रेल्वे गेट आणि तेथून काँग्रेस रोड मार्गे खानापूर पिरनवाडीच्या दिशेने असणार आहे. महाराष्ट्र राज्यातून गोव्याकडे जाणाऱ्या सर्व खाजगी वाहनांनी हिंडाल्को ब्रिज येथून बॉक्साईट रोड मार्गे हिंडलगा अरण्य नाका, हिंडलगा गणेश मंदिर, गांधी सर्कल, ग्लोब सर्कल, गोगटे सर्कल काँग्रेस रोड मार्गे गोव्याला जावयाचे आहे. तसेच गोव्याकडून महाराष्ट्र राज्यकडे जाणाऱ्या खासगी वाहनांनी तिसरे रेल्वे गेट, काँग्रेस रोड, गोगटे सर्कल, गांधी सर्कल, हिंडलगा गणेश मंदिर, हिंडलगा अरण्य नाका, बॉक्साइट रोड, एनएच -4 मार्गे महाराष्ट्राच्या दिशेने जावयाचे आहे.

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर विशेष सूचना जारी करण्यात आल्या असून त्यानुसार मतमोजणी केंद्रावर येणार्‍या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह उमेदवार आणि एजंटना मोबाईल, गुटखा पाकीट, शाईचे पेन, कॅमेरा, काड्यापेटी, सिगारेट, लायटर आणि इतर निषेधार्ह वस्तू आपल्या सोबत आणण्यावर बंदी असणार आहे. मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाने 48 तासापेक्षा जुने नसणारे आरटी -पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाने कोरोनासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे. फेसमास्क आणि सामाजिक अंतराचे भान ठेवावे, असे आवाहन प्रसिद्धिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.