बेळगाव पोलिसांना सरकारने घालून दिलेल्या नियमावली प्रमाणे कामगार वर्गाला अडवणूक करू नये अश्या सूचना आपण बेळगाव पोलिसांना दिल्या आहेत असे ट्विट कोविड नोडल अधिकारी अतिरिक्त पोलीस महासंचालक भास्कर राव यांनी केले आहे.
गुरुवारी बेळगाव शहरातील विशेष करून शहापूर आणि टिळकवाडी पोलिसांनी कामाला जाणाऱ्या कामगारांच्या दुचाकी जप्त करून दंड वसूल केला होता त्याचा फटका मोल मजुरी करून उपजीविका करणाऱ्या बांधकाम आणि इंडस्ट्रीत मध्ये काम करणाऱ्याना बसला होता.
Spoke to Compol Belagaum. Instructions have been issued to officers and personnel to allow movement for permitted activities but they are advised not move unnecessarily beyond stipulated timings. This is Public Interest..
— Bhaskar Rao (@deepolice12) April 30, 2021
कामगारांनी शासनाने घालून दिलेल्या वेळेतच बाहेर पडावे जेणे करून कामगारांना पोलीस अडवणूक करणार नाहीत असेही भास्कर राव यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.कोविड लॉक डाऊन 2 मध्ये बांधकाम आणि इंडस्ट्री मध्ये काम करायला परवानगी आहे त्यानुसार अनेक कामगार सकाळच्या वेळेत कामावर जात असतात मात्र पोलिसांनी त्यांची अडवणूक करून त्रास देण्याचे सत्र अवलंबले आहे याची तक्रार अनेकांनी ए डी जी पी भास्कर राव यांच्या कडे केली होती काल रात्रीच त्यांनी पोलीस आयुक्त त्यागराज यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा करत सामान्य माणसाना त्रास करू नये अश्या सूचना दिल्या होत्या.
युवा समितीने देखील राव यांना ट्विट करत तक्रार केली होती त्याला रिट्विट करत अतिरिक्त पोलिस महासंचालकानी बेळगाव पोलिसांना सूचना केल्याची माहिती दिली आहे.
रोगापेक्षा धास्ती पोलिसांची!वाचा बेळगाव live