कोरोना महामारी रोखण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज गुरूवार दि. 22 एप्रिलपासून ते येत्या दि. 4 मे 2021 पर्यंत पुन्हा लॉकडाऊन अर्थात टाळेबंदी 2.0 लागू केली आहे. या टाळेबंदी दरम्यान बंद आणि चालू राहणारे व्यवहार खालीलप्रमाणे आहेत.
टाळेबंदी 2.0 दरम्यान चालू राहणारे व्यवहार पुढील प्रमाणे असतील. 1) जीवनावश्यक वस्तू संबंधित दुकान. 2) हॉटेल व रेस्टॉरंट (फक्त पार्सल). 3) किराणा दुकाने. 4) इस्पितळं, क्लीनिक्स, मेडिकल्स.
5) प्रवासी वाहतूक (50% क्षमतेची मुभा). 6) बांधकाम संबंधित दुकाने. 7) बँक व सोसायटी (सकाळी 10 ते दुपारी 2), 8) औद्योगिक कारखाने. टाळेबंदीच्या कालावधीत पुढील गोष्टी बंद राहतील. 1) शॉपिंग मॉल. 2) शाळा-महाविद्यालय. 3) व्यायामशाळा. 4) जलतरण तलाव व योगा केंद्र. 5) राजकीय व धार्मिक सार्वजनिक कार्यक्रम.
6) व्यापारी आस्थापने. 7) चित्रपटगृहे. सदर टाळेबंदीच्या कालावधीमध्ये नागरिकांनी मास्क व सॅनीटायझरचा नियमितपणे वापर करून गर्दी टाळावी आणि घरामध्ये सुरक्षित रहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.