बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक अवघ्या काही तासाच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. बेळगाव जिल्ह्यात दहा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असले तरी चुरशीची लढत ही केवळ ३ उमेदवारांमध्ये रंगणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके, भाजपच्या अधिकृत उमेदवार मंगला अंगडी आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सतीश जारकीहोळी यांचा समावेश आहे. १७ एप्रिल रोजी संपूर्ण जिल्ह्यात होणाऱ्या या निवडणुकीच्या मतप्रक्रियेला सकाळी ७ वाजता सुरुवात होणार असून निवडणुकीतील ईव्हीएम मशीनमधील उमेदवारांची यादी, त्यांचे क्रमांक आणि त्यांचे चिन्ह याचा तक्ता खालील प्रमाणे आहे.
१. भाजपा – मंगला अंगडी – कमळ
२. काँग्रेस – आमदार सतीश जारकीहोळी – हात / पंजा
३. कर्नाटक राष्ट्र समिती – विवेकानंद बाबू घंटी – शिट्टी
४. हिंदुस्थान जनता पार्टी – व्यंकटेश्वर महास्वामीजी – ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी
५. कर्नाटक कामगार पक्ष – सुरेश बसाप्पा मरीलिंगण्णावर – आँटो रिक्षा
६. अपक्ष – अप्पासाहेब कुरणे – कप बशी
७. अपक्ष – गौतम यमन्नाप्पा कांबळे – पंचींग मशिन
८. अपक्ष – नागप्पा कळसन्नवर – गॅस सिलेंडर
९. म. ए. समिती – शुभम शेळके – सिंह
१०. अपक्ष – श्रीकांत पडसलगी – प्रेशर कुकर