Monday, January 6, 2025

/

फेडरेशन कप शरीरसौष्ठव स्पर्धा : अंकिता सिंग “वूमन्स स्पोर्ट्स मोडेल फिजिक!”

 belgaum

लखनौ (उत्तर प्रदेश) येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 10 व्या फेडरेशन कप राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील महिलांच्या “वूमन्स स्पोर्ट्स मोडेल फिजिक” हा किताब कर्नाटकच्या अंकिता सिंग हिने पटकाविला आहे. अंकित ही बेळगावचे शरीरसौष्ठवपटू तसेच इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन या मान्यताप्राप्त संघटनेचे दक्षिण भारत आणि कर्नाटकचे जनरल सेक्रेटरी अजित सिद्दण्णावर यांची शिष्या आहे हे विशेष होय.

इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनतर्फे आयोजित 10 वी फेडरेशन कप राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा गेल्या 3 व 4 एप्रिल 2021 रोजी लखनौ (उत्तर प्रदेश) येथे यशस्वीरित्या पार पडली. 55 किलो पासून 100 किलोवरील अशा विविध दहा वजनी गटात सदर शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्यात आली. सदर शरीर सौष्ठव स्पर्धेतील महिलांसाठी असलेल्या विभागात कर्नाटकच्या अंकिता सिंग हिने ‘वुमन्स स्पोर्टस मोडेल फिजिक’ या 162 सें. मी. वरील उंची गटात आपल्या शरीरसौष्ठवाचे अत्युत्तम सादरीकरण करत सुवर्णपदक हस्तगत केले. अंकिता सिंग हिला बेळगावच्या अजित सिद्दण्णावर यांचे मार्गदर्शन लाभत आहे लखनौ येथे झालेल्या या राष्ट्रीय पातळीवरील फेडरेशन कप शरीरसौष्ठव स्पर्धेत तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवपटुंनी आपले वर्चस्व गाजविले.

सदर 10 वी फेडरेशन कप राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे सर्वसाधारण अजिंक्‍यपद तामिळनाडूच्या कार्तिकेश्वर रवीकुमार याने पटकाविले आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेतील सांघिक विजेतेपद देखील तामिळनाडू संघाने सर्वाधिक 260 गुणांसह हस्तगत केले आहे. सांघिक मूल्यांकनात महाराष्ट्राचा चमू 165 गुणांसह उपविजेता ठरला. स्पर्धेतील बेस्ट पोझर म्हणून उत्तर प्रदेशच्या प्रशांत नायक याला सन्मानित करण्यात आले. महिला विभागात पिळदार शरीर शरीरसौष्ठवाच्या बाबतीत हरियाणाची गीता सैनी ही सर्वात सरस ठरली. तिने महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेचे जेतेपद हस्तगत केले. सदर स्पर्धेतील विमेन्स फिटनेस फिजिक हा किताब पश्चिम बंगालच्या सोनिया मित्रा हिने तर 162 सें. मी. पर्यंतच्या गटातील वुमन स्पोर्ट्स मोडेल फिजिक हा किताब संजू (सीआरएससीबी) हिने मिळविला.Ankita singh

दरम्यान, कर्नाटकच्या अंकिता सिंग हिने ‘वुमन्स स्पोर्टस मोडेल फिजिक’ या 162 सें. मी. वरील उंची गटात आपल्या शरीरसौष्ठवाचे अत्युत्तम सादरीकरण करत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल तिचे गुरु अजित सिद्धांतावर यांचे बेळगाव परिसरात अभिनंदन होत आहे.

आज-काल शरीरसौष्ठव क्षेत्रातील बरेच युवक बेरोजगार फिरत आहेत. या अनुषंगाने फेडरेशन कप या प्रतिष्ठेच्या शरीरसौष्ठव स्पर्धेसंदर्भात बेळगाव लाईव्हने अजित सिद्दण्णावर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या स्पर्धेचे महत्त्व विषद केले. सदर स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना त्यांचे शिक्षण व अन्य अहर्तता तपासून थेट सरकारी नोकरीत समाविष्ट करून घेतले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले. तेंव्हा बेळगावच्या फक्त युवक-युवतींनी याचा गांभीर्याने विचार करावा, व्यसनांच्या आहारी जाण्याऐवजी आपल्या भावी कारकिर्दीचा विचार करावा. व्यायाम करावा आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवावे, असे आवाहन अजित सिद्दण्णावर यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.