बेळगावसह विजापूर या भागातील कोविड नियंत्रणासाठी एका खास एडीजीपी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. कर्नाटकात अनेक ठिकाणी कोविडग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे.
अतिरिक्त पोलीस महा संचालक (एडीजीपी) भास्कर राव यांची नियुक्ती कोविड कंट्रोलसाठी करण्यात आली असून शुक्रवारी सकाळी ते बेळगावमध्ये दाखल होणार आहेत. बेळगावमधील कोविड परिस्थिती हाताळण्यासाठी आणि नियंत्रणात आणण्यासाठी बेळगावमध्ये अधिकाऱ्यांसमवेत ते बैठक घेणार असून कोविड संदर्भातील कामकाज ते पाहणार आहेत.
बेळगावमध्ये पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पोलीस प्रशासन कोविड नियंत्रणासाठी कार्यरत आहे.
पोलीस विभागामधील कोविड नियंत्रण विभागाचे कामकाज पाहण्यासाठी एडीजीपी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून कामकाज पाहण्यात येणार आहे. यासाठी भास्कर राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कोविड मार्गसूचीचे पालन करणे, तसेच कोविड नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यासाठी हे अधिकारी कार्य करणार आहेत.
कर्नाटक राज्य पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांनी एका आदेशानुसार भास्कर राव यांची बेळगाव बागळकोट आणि विजापूर या तीन जिल्ह्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.या अगोदर भास्कर राव यांनी बेळगाव आय जी पी आणि पहिले पोलीस आयुक्त म्हणून इथे काम केलेले आहे.