बेळगाव जिल्ह्यामध्ये आज गुरुवार दि. 15 एप्रिल रोजी नव्याने 135 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 763 वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात आज आणखी एकाचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 353 झाली आहे. उपचाराअंती बरे झालेल्या 32 जणांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान बेळगाव जिल्ह्यात गेल्या 1 एप्रिल 2021 पासुन आजपर्यंत आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 968 इतकी झाली आहे.
तसेच आजची 135 ही रुग्ण संख्या 2021 या वर्षातील आत्तापर्यंतची एका दिवसात आढळलेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे.