Saturday, November 16, 2024

/

बेळगाव स्मार्ट सिटीच्या कामांनी घेतला आणखी एक युवकाचा बळी?

 belgaum

भरधाव दुचाकी रस्त्यावर पसरलेल्या खडीवर घसरून पडल्यामुळे घडलेल्या अपघातात एक युवक ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री टिळकवाडीतील गोगटे कॉलेज समोर घडली. या पद्धतीने स्मार्ट सिटीच्या विकास कामांनी आणखी एकाचा बळी घेतल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मयत युवकाचे नांव महेश टक्केकर (वय अंदाजे 26 वर्षे, रा. ओमकारनगर वडगाव) असे आहे. गेल्या पाच-सहा वर्षापासून स्मार्ट सिटीची विकास कामे रखडत सुरू आहेत. बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यापैकी बऱ्याच रस्त्यावरील दगड -माती अथवा पसरलेली खडी वेळच्यावेळी काढून टाकण्यात आलेली नाही.

टिळकवाडीतील गोगटे कॉलेजसमोर देखील अशाच प्रकारे रस्त्यावर खडी पडून आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री महेश टक्केकर हा युवक आपल्या दुचाकीवरून घराकडे निघाला असता गोगटे कॉलेज समोरील रस्त्यावरील खडीवर त्याची दुचाकी घसरून पडली. या अपघातात महेशच्या डोक्याला गंभीर इजा झाली. गाडी घसरून पडल्याचा मोठा आवाज होताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.Mahesh takkekar

त्याचप्रमाणे तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांनी गंभीर जखमी झालेल्या महेशला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविले. सिव्हिलमधील डॉक्टरांनी महेशची चिंताजनक अवस्था लक्षात घेऊन त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार काल रात्री उशिरा महेश टक्केकर याला अधिक उपचारासाठी केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचाराचा फायदा न होता  शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.

रखडत चाललेल्या स्मार्ट सिटीच्या विकास कामांनी घेतलेला शहरातील हा आतापर्यंतचा चौथा बळी आहे. यापूर्वी मंडोळी रोडसह शहरात अन्य दोन ठिकाणी स्मार्ट सिटीच्या कामामुळे तिघांचा बळी गेला आहे. गोगटे कॉलेज समोरील रस्त्यावर पडून असलेली खडी वेळच्यावेळी काढून टाकण्यात आली असती तर आज महेशचा बळी गेला नसता अशी प्रतिक्रिया अपघातस्थळी व्यक्त केली जात होती. तसेच स्मार्ट सिटी लिमिटेडच्या बेजबाबदार कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत होता.

 belgaum

1 COMMENT

  1. Frist gate te gogte circle ha rasta kayam andhrat ahe
    Tytch pop in hotel samor valu pasrli ahe
    Ka ajun ek bali chi vat pahat ahe government

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.