Tuesday, January 14, 2025

/

या शाळेजवळ आढळले तब्बल 5 साप!

 belgaum

सध्या वळिवाचा मौसम असून गेल्या आठवड्याभरात अनेक ठिकाणी वळिवाच्या पावसाने हजेरी लावली आहे. आता या पावसानंतर अनेक ठिकाणी सापांचे दर्शन होऊ लागले आहे. सर्वसामान्यपणे एखादा छोटा साप जरी आपल्या निदर्शनास आला, तर आपली घाबरगुंडी उडते.

परंतु येळ्ळूर परिसरातील शाळेत चक्क 5 नागसाप निदर्शनास आले आहेत. विशेष म्हणजे याच ठिकाणी मागील वर्षीदेखील असेच नागसाप आढळून आले होते. येळ्ळूर येथील सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांनी अनेक ठिकाणी केलेल्या जनजागृतीमुळे सध्या जनतेत सापांविषयीची भीती काहीशी दूर होत आहे. याचा प्रत्यय येळ्ळूर येथील शाळेत आला.

आनंद चिट्ठी हे वेळोवेळी सापांविषयी मार्गदर्शन करत असतात. मागील वर्षीही येळ्ळूर येथील याच शाळापरीसरात याचठिकाणी नागसापाची आढळून आली होती. आनंद चिठ्ठी यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती केल्याने आज मात्र हे साप आढळल्यावर कोणाचीही घाबरगुंडी उडाली नाही, हे विशेष!Chitti 4 snake

आज आढळलेले हे नागसाप साधारण 5 ते 6 वर्षे वयोगटातील असून 2 नाग व दोन धामण जातीचे साप आनंद चिट्टी यांनी जवळपास १ तासाच्या शोधमोहिमेत पकडले. मागील वर्षीही याचठिकाणी २ नागसाप पकडण्यात आले होते.

सध्या होत असलेला वातावरणातील बदल व नाग तसेच धामण सर्पांचा मिलन काळ असल्याने या दोन्ही सापाच्या जाती मोठया प्रमाणात बाहेर पडत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी सांगितले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.