आगामी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सर्वत्र पसरली आहे. परंतु सतीश जारकीहोळी यांनी लोकसभा पोटनिवडणूक लढवू नये, असे आवाहन त्यांच्या समर्थकांनी त्यांना केले आहे.
यमकनमर्डी मतदार संघ सोडू नका, आणि लोकसभा पोटनिवडणूक लढवू नका, अशा आशयाच्या पोस्ट सोशल साईटवर झळकत आहेत. सतीश जारकीहोळी चाहत्यांनी या पोस्ट सोशल साईट्सवर व्हायरल केल्या असून यमकनमर्डी मतदार संघातून एक्झिट न घेण्यासाठी त्यांना विनंती केली आहे.
सतीश जारकीहोळी यांनी उमेदवारी मिळण्यासाठी जबरदस्ती केल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहेत. सतीश जारकीहोळी हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी जोरदार तयारीदेखील सुरु केली आहे. त्यांच्या वाहनावरदेखील २०२३ असा विशेष क्रमांक आहे.
२०२३ च्या लोकसभा पोटनिवडणूक नजरेसमोर ठेऊन मुख्यमंत्री होण्याचा निर्धारही त्यांनी केला आहे. यासाठी मध्यावधी होणाऱ्या पोटनिवडणुकीत त्यांनी सहभाग घेऊ नये, या राजकारणात देखील सहभाग घेऊ नये, थेट मुख्यमंत्री पदाची तयारी करावी, अशी मागणी जारकीहोळी समर्थकांनी केली आहे. सोशल साईटवर कमेंट चळवळ जोरदार सुरु आहे.
प्रकाश हुक्केरी यांच्यासारखा प्रभावशाली राजकारणी काँग्रेसकडे असून त्यांच्या नावाचा उल्लेख हेतुपूर्वक करण्यात आला नाही. सतीश जारकीहोळी हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने त्यांना या राजकारणात ओढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांच्या चाहत्यांनी सोशल साईटवर नमूद केले आहे.