कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आणि धारवाड विभागीय क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बेळगाव जिल्हा 16 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघाची निवड चांचणी नुकतेच उत्साहात पार पडली.
शहरातील ऑटोनगर येथील केएससीए क्रिकेट स्टेडियमवर धारवाड विभाग क्रिकेट संघटनेच्या आदेशानुसार काल रविवारी निवड चाथचणी आयोजित करण्यात आली होती. या निवड चांचणीला बेळगाव जिल्ह्यातील 100 हून अधिक क्रिकेटपटू उपस्थित होते.
स्टेडियमच्या क्रिकेट नेट्समध्ये घेण्यात आलेल्या या निवड चांचणी प्रक्रियेमध्ये सकाळच्या सत्रात प्रारंभी 50 क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात अंतिम 15 खेळाडूंची निवड करून अंतीम यादी तयार करण्यात आली.
सदर निवड चांचणीद्वारे हुबळी येथे होणाऱ्या 16 वर्षाखालील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या बेळगाव संघातील खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत. तनिष्क नाईक, सुदीप सातेरी, परवेज मोरब, अर्णव नुगानट्टी,
पियुष गहलोत, श्रेयश माटीवड्डर, हर्ष पटेल, प्रथम मास्तमर्डी, साईराज देसाई, अभिषेक निकम, सिद्धार्थ हुल्लोळी, साई कारेकर, ध्रुव देसाई, तनुष धुमाले आणि सात्विक सावंत. रविवारी झालेल्या निवड चांचणी प्रक्रियेत धारवाड विभागीय क्रिकेट संघटनेचे समन्वयक अविनाश पोतदार, संगम पाटील, प्रसन्ना सुंठणकर आणि आनंद करडी यांनी काम पाहिले.