एकीकडे तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांच्या बदलीचे प्रयत्न सुरू असताना त्यांनी मात्र आपल्या कामांसाठी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या त्यांच्यावर खानापूर तालुक्याचा ही भर टाकण्यात आला आहे.
दरम्यान बेळगाव तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींच्या दुरुस्तीसाठी त्यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला चार लाख रुपये प्रमाणे हा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
बेळगाव तालुक्यात जिल्ह्यात ही अनेक ग्रामपंचायतीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा पंचायत प्रस्ताव पाठवला असला तरी बेळगाव तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींसाठी हा निधी मंजूर करून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हरळीकट्टी, आंबेवाडी, अष्ठे, बाळेकुंद्री बी के, देसुर, बेकिनकेरी, बेळवट्टी, बम्बरगा, होनगा, कडोली, धामणे, काकती, केदनुर, मुतगा, सांबरा, संतीबस्तवाड, येल्लूर, सुळगा, रंगदोळी, तारीहाळ या ग्रामपंचायतींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
ग्रामपंचायतींच्या दुरुस्तीसाठी हा निधी मंजूर करण्यात येणार असून त्यासाठी आता राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. राज्य सरकारने याला हिरवा कंदील दाखवल्यानंतर तातडीने ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. काही ग्रामपंचायतीमध्ये पीडीओनाही याची कल्पना नाही. मात्र बेळगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी मल्लिकार्जुन कलादगी यांनी मोठे प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे आता 80 लाख रुपये तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी मंजूर होणार आहेत. यासाठी आता लवकरच राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवल्यानंतर कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.