चला पाणी संवर्धनासाठी… वाचवा थेंब अन् थेंब पाणी! एकमेकांना दोष देत बसण्यापेक्षा ही कृती करण्याची वेळ आहे आणि आपली ती जबाबदारी देखील आहे. तेंव्हा जर तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी नळ गळती आढळून आली तर आमच्या हेल्पलाइन नंबरवर फोन करा. हे आवाहन शहरातील मेहता प्लास्टने केले आहे.
बेळगाव शहर उपनगरांमध्ये जलवाहिन्या फुटून शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. मंगळवारीच गोवावेसनजीक व रामदेव हॉटेलनजीक जलवाहिन्या फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. यात भर म्हणून आता उन्हाळ्याची सुरुवात झाली असून पुढे पाणीटंचाईचा धोका नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर मेहता प्लास्ट या सेवाभावी संस्थेने सार्वजनिक ठिकाणची नळ गळती थांबून पाण्याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी सार्वजनिक ठिकाणची फक्त नळ गळती निदर्शनास आणून देण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांनी नळ गळती निदर्शनास आणून देताच मेहता प्लास्टरचे नळ गळती दुरुस्त करणारे पथक तात्काळ घटनास्थळी जाऊन पाण्याची गळती थांबवणार आहे. तसेच त्या ठिकाणी उपस्थित नागरिकांना पाणी वाचविण्याचे महत्त्वही समजावून देणार आहे. पाणी वाचविण्यासाठी मेहत प्लास्ट आपल्यापरीने ही मोहीम राबवत आहे. तेंव्हा नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणच्या नळ गळती संदर्भात 7090710710 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.