होळीच्या निमित्ताने बेळगावमधील सामाजिक कार्यकर्ते आणि हेल्प फॉर निडी या संस्थेचे संस्थापक सुरेंद्र शिवाजी अनगोळकर यांनी वडगाव स्मशानभूमीत वृक्षारोपण केले.
सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशन आणि ग्रीन सेव्हियर्स यांच्या माध्यमातून सुमारे २५० रोपांची लागवड करण्यात आली.
या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यात बेळगाव परिसरातील स्मशानभूमींना भेट देण्यात येते. स्मशानभूमीची स्वच्छता तसेच वृक्षारोपण करण्यात येते.
आज वडगाव स्मशानभूमीत हाती घेण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमात समीर माजली, रक्षा मॅडम, सुहानी लोकम, ललिता शर्मा, शिवानंद मालेगौडर, सुरेंद्र अनगोळकर, ग्रीन सेव्हियर्स स्वयंसेवक आदींनी सहभाग घेतला.
प्रत्येकाने एखाद्यातरी वृक्षलागवडीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सुरेंद्र अनगोळकर आणि ग्रीन सेव्हियर्स संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.