गेल्या आठवड्याभरात मंगळवार पेठ, टिळकवाडी येथील एका गवळी कुटुंबाची तब्बल 11 जनावरे अज्ञात आजारामुळे दगावल्या मुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याची दखल शिवसेनेचे संघटक दत्ता जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपताना संबंधित गवळी कुटुंबाला 21 हजार रुपयाची आर्थिक मदत देऊ केली आहे.
मागील आठ दिवसाच्या कालावधीमध्ये मंगळवार पेठ, टिळकवाडी येथील दूध व्यवसायिक पिराजी चौधरी (गवळी) यांच्या गोठ्यातील 10 जनावरे दगावली असून आज आणखी एका म्हशीचा मृत्यू झाला. पशुवैद्यकीय खात्याच्या डॉक्टरांनी मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या रक्ताचे नमुने घेतले असले तरी अद्याप आजाराचे निदान स्पष्ट झालेले नाही.
गोठ्यातील तब्बल 11 जनावरे एकापाठोपाठ एक दगावल्यामुळे पिराजी चौधरी (गवळी) कुटुंबाचे 11 लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. दगावलेल्या जनावरांमध्ये आठ दुभत्या म्हशी, दोन रेडके आणि एका रेड याचा समावेश आहे. सदर गवळी कुटूंबीय दुधाचा व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवत होते. मात्र आता गोठ्यातील दुभत्या म्हशीच मृत्युमुखी पडल्याने या कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे.
पिराजी चौधरी (गवळी) कुटुंबीयांची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना मदत करण्यासाठी सरसावताना बेळगावातील शिवसेनेचे संघटक आणि सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव यांनी आज शनिवारी सकाळी पिराजी गवळी यांची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच आपल्यातर्फे त्यांच्याकडे 21 हजार रुपयांचा धनादेश मदती दाखल सुपूर्द केला.
याप्रसंगी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, सागर पाटील, बाळू जोशी, सचिन केळवेकर,कांता शिंदे, गणेश दद्दीकर आदीसह शिवसैनिक आणि समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी बेळगाव लाइव्हशी बोलताना दत्ता जाधव यांनी मोठ्या प्रमाणात म्हशी मृत्युमुखी पडल्यामुळे संकटात सापडलेल्या पिराजी गवळी कुटुंबाला थोडाफार आधार मिळावा म्हणून आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून ही आर्थिक मदत करत असल्याचे सांगितले.
शुभम शेळके यांनी यावेळी बोलताना चौधरी कुटुंबाला सध्या सांत्वनाची नाही तर पाठबाळासह मदतीची गरज असल्याचे सांगितले. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तीने या गवळी कुटुंबाची परिस्थिती जाणून घेऊन त्यांना मदत करावी.
त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांनीही यासाठी पुढे येऊन आपल्यापरीने पिराजी चौधरी (गवळी) कुटुंबाला सहाय्य करावे, असे आवाहन शुभम शेळके यांनी केले. पीडित गवळी कुटुंबाला आर्थिक सहाय्य करू इच्छिणाऱ्यांनी
9964782027 या मोबाईल क्रमांकावर (फ़ोन पे) भारत पीराजी चौधरी कॉसमॉस बँक(टिळकवाडी ब्रांच अकाउंट नंबर 0910501022127 तर ifsc code cosb0000091 या बँक खाते क्रमांकावर आपली मदत जमा करावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
https://www.instagram.com/p/CMoqXaBhRvM/?igshid=z7jnnuijb32a