रोटरी परिवार बेळगाव आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 21 मार्च 2021 रोजी बेळगाव येथे आयोजित केलेले कृत्रिम अवयव बसविण्याचे शिबीर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन पुढे ढकलण्यात आले आहे.
अयोध्यानगर, कार्पोरेशन रोड येथील विजया ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटर येथे 21 मार्च 2021 रोजी सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते.
परंतु शेजारील राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि आपल्या राज्याचा एसओपीसह मार्गदर्शकसुचीमुळे साधू वासवानी मिशन पुणे येथील डॉक्टर आणि तंत्रज्ञ बेळगावला येणे कठीण असल्यामुळे तसेच कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करण्यासाठी हे कृत्रिम अवयव बसविण्याचे शिबीर पुढे ढकलण्यात आले आहे.
याची लाभार्थीने नोंद घेऊन 21 रोजी शिबिराच्या स्थळी येऊ नये, असे आवाहन रोटरी परिवार बेळगावने केले आहे.